Breaking News

आज शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी मनसेच्या पुढाकाराने बैलबंडी आक्रोश मोर्चा

बैलबंडी सह शेतकरी भजन मंडळीना घेऊन सरकारला कर्जमाफीसाठी घेरनार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा :-जिल्ह्यात वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील जवळपास 1500 शेताकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मधे पात्र लाभार्थी म्हणून निवड झाली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे कर्जमाफी झाली नाही, जवळपास 2000 नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली 50 हजार प्रोत्साहन राशी मिळाली नाही तर 3 हजार शेताकऱ्यांना ओला दुष्काळ व अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी हवालदील झाला असून काही बैंक व्यवस्थापकांनी शेताकऱ्यांना नोटीस पाठवून कर्ज भरा अन्यथा तुमचे बैंक अकाउंट शील करू अशी धमकी दिली आहे तर काही शेतकऱ्यांची बैंक खाती शील सुद्धा करण्यात आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात मोठा आक्रोश असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा पिडीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे व सध्या मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय व्हावा याकरिता आज दिनांक १५ मार्च ला बैलबंडी मोर्चातून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन वरोरा मनसे तर्फे करण्यात आले आहे.

आज होणाऱ्या या बैलबंडी मोर्च्यात मोठ्या संखेने शेतकरी व महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, शेतकऱ्यांचे नेत्रुत्व करणारे भदुजी गिरसाळवे, मनसेचे विशाल देठे, राम पाचभाई, प्रशांत बदकी, गजू वादाफळे, मोहित हिवरकर, श्रीकांत तळवेकर, अभिजीत पावडे, प्रणय लोणकर. संदीप मोरे, विनोद खडसंग,राजेंद्र धाबेकर, पंकज पेटकर, मनोज गाठले, युगल ठेंगे,पवन ढोके, जयंत चौधरी, सुभाष बाटबरवे ,शंकर क्षिरसागर, दिलीप उमाटे, प्रतीक मुडे, मनोहर खिरटकर अनिल दोमणे, अतुल गावंडे, दिलीप दोहतळे, अभय आसुटकर, शुभम वाकडे, प्रमोद हनवते, अशोक दाते, दिनेश जुमडे, शुभम नरड, संदीप धानोरकर, राजु पवार, प्रकाश धोपटे, विष्णू मुंजे, आसिफ शेख, अनिकेत गुजरकर, महिला सेना रेवती इंगोले, पोर्णिमा शेट्टी, शुभांगी मोहरे, अनिता नकवे, ज्योती मुंजे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्रिमूर्ती पब्लिक स्कूल शेवगांव येथे आंतररराष्ट्रीय योग दिवस साजरा योगशिक्षक सुरेश बोरुडे पाटील यांनी दिले विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-दिनांक 21/06/2024 वार शुक्रवार आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला आपल्या …

योग दिनात ५०० नागरिकांनी केली योग प्रात्यक्षिके

जिल्हास्तरीय कार्यक्रमाला प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved