
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगांव:-शहरातील परीचीत असलेले तरुण नेतृत्व दैनिक नवराष्ट्रचे तालुका बातमीदार विनोद बाबाराव अलबनकर (३७ ) राहणार गांधी लेआऊट यांनी आज दिनांक १५ मार्च २० २३ ला सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान आपल्या मुळ गांवी कोदुर्ली येथील जुन्या घरी कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली . मोठा भाऊ विक्रांत कोदुर्ली येथील शेतात जाण्यासाठी गेला असता त्याला घरा पुढे विनोद ची दुचाकी उभी दिसली विनोद घरी काय करत आहे म्हणून विक्रांत पहायला गेला असता विनोद गळफास घेऊन लटकलेला दिसला घराची उंची कमी असल्याने त्याचे पाय खाली टेकले होते.
विक्रांत ने पाहिल्या बरोबर त्याला सुचेनासे झाले सोबतच्या मित्राला आवाज देवून दोघांनी विनोदला खाली घेतल . गांवात माहिती वाऱ्यासारखी पसरली विक्रांत ने माहिती राळेगाव पोलीस ला दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले व विनोद चे प्रेत राळेगांव ग्रामीण रुग्णालयात आणले उत्तरीय तपासणी करण्यात आली . आज सकाळी विनोद आपल्या मुलाला महावीर कॉन्व्हेंट मधे सोडून आला,
त्यानंतर तो घरून सरळ कोदुर्ली ला जातो म्हणून सांगून गेला आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला शहरात नवराष्ट्र वृत्तपत्रात तालुका प्रतिनिधी म्हणून काम करताना शासकीय प्रशासकीय सामान्य माणसाची त्याची नाळ जुळलेली होती एक उमदा व होतकरू तरुण म्हणून त्याची ओळख होती .उमेद मध्येही त्याने चांगल्या पद्धतीने काम केले याच वर्षे त्याने वेगळी शेती केली होती . शेती साठी खाजगीतील कर्जाचा भार वाढल्याचे काहीशी चर्चा ऐकायला मिळाली .त्याच्या मागे आई – वडील बाबाराव अलबनकर (माजी सरपंच ) भाऊ विक्रांत पत्नी काचंन मुल हिमांशू , प्रियांशू छोटे मुलआहेत . विनोद च्या अशा जाण्याने समाजमन हेलावून गेले राळेगांव येथील स्मशान भूमित त्यांच्यावर साश्रू नयनानी अंत्यसंस्कार करण्यात आले . उपस्थीतांनी विनोदला श्रद्धांजली वाहिली .