
राळेगाव येथे महाविकास आघाडी तर्फे केंद्रसरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचं खासदार पद रद्द केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक २७ मार्च रोजी राळेगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकार च्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाला काँग्रेस कार्यालयापासून सुरुवात झाली गावातील प्रमुख मार्गाने निघून तहसील कार्यालया वरती मोर्चा धडकता तहसील कार्यालयाच्या समोर काँग्रेसचे नेते माजी मंत्री प्रा वसंत पुरके जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष अँड प्रफुल्ल मानकर जिल्हा ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद वाढोनकर, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष विनोद काकडे यांची यावेळी भाषण झाले.यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या शेवटी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले मोर्चामध्ये तालुक्यातून आलेले काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले सोबतच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यांचेही कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना एका प्रकरणात २ वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर,२४ तासाच्या आत लोकसभा सचिवालयाकडून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.लोकशाही मध्ये विरोधी पक्ष आवश्यक आहे.मात्र मागील नऊ वर्षात मोदींच्या काळात जे जनतेचे प्रश्न घेऊन आवाज उठवितात त्यांना तुरुंगात टाकले जाते आहे.राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रे नंतर देशातील जनता काँग्रेस मागे उभी राहत आहे.भाजप सरकारच्या विरोधात जनमत तयार होत आहे.म्हणून राहुल गांधी यांना कुठेतरी अडकविण्याचा प्रयत्न केंद्रातील मोदीसरकार कडून सुरु आहे असे आरोप यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चात करण्यात आले.
यावेळी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात “या भाजप सरकारचे करायचे काय,खाली मुंडकं वर पाय” अशी जोरदार घोषणा बाजी करून निषेध करण्यात आला,यावेळी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुने , शिवसेनेचेतालुकाप्रमुख विनोद काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे, शिवसेनेचे शहर प्रमुख राकेश राहुळकर, वसंत जिनिंगचे सभापती नंदकुमार गांधी खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपाध्यक्ष जानराव गिरी राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे ,अंकुश मुनेश्वर,संजय देशमुख,मनोज मानकर,गोवर्धन वाघमारे,अफसरअली सैय्यद,
प्रदीप लोहकरे राहुल बहले मंगेश राऊत निशांत मानकर अभिजित मानकर निलेश हिवरकर सुवेध भेले,महिला तालुकाध्यक्ष पुष्पाताई कोपरकर,
जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक जोत्सना डंभारे,सौ मोहिनी बोबडे,माजी नगराध्यक्षा मालाताई खसाळे अश्विनी लोहकरे,नलुताई शिवणकर,नगरसेविका,सिमरन पठाण,श्रावनताई इंगोले ,नलिनी पराते,यासह आदी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.