
पाणी फिल्टर फक्त नावाचे
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/भिसी:-भिसी नगरपंचायत द्वारे भिसीवाशियांना असुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे अशी चर्चा सर्व प्रभागातील नागरिकांमध्ये सुरु आहे.याला जबाबदार भिसी नगरपंचायतीचे प्रशासक प्राजक्ता बुरांडे व सिओ राठोड मॅडम हे आहेत कारण याची वारंवार अनुपस्थिती व यामुळे नगरपंचायतिच्या कामकाजाकडे होत असलेले दुर्लक्ष हेच मुख्य कारण आहे. अशी चर्चा सर्व भिसी शहरात चालू आहे.भिसी ग्रामपंचायत असतांना ते आजपर्यंत पाण्याचा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय व मठका फोड आंदोलन यापर्यंत गजलेला आहे व आजही फिल्टर केलेल्या पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा पुरवठा नळाद्वारे नागरिकांना होत आहे.
यामुळे बालगोपाल, माताऱ्यांमध्ये अतिसार, उलटी, यासारखे रोगाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. याला जिम्मेदार नगरपंचायतीचे कर्मचारी व मुख्यता प्रशासक, व सिओ आहे कारण यांचे भिसी नगरपंचायतिला नेहमीच अनुपस्थिती असते. याकडे नगरपंच्यातीने जातीने लक्ष घालून वेळीच सुधारणा व उपाय योजना करावी अन्यथा नागरिकांच्या धैर्यतेचा बाण तुटण्यास वेल लागणार नाही.
आमच्या घरच्या नळाला नियमित अशुद्ध, पिवळसर रंगाचे पाणी पुरवठा होत आहे.फिल्टरच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल कारण्याचा नगरपंचातीचा डाव -नागरिक भाऊराव ठोंबरे सामाजिक कार्यकर्ता.