
पळसगांव नाईट सफारी प्रकरण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-चिमूर/पळसगांव वनपरिक्षेत्रात नाईट सफारीचा सुविधा उपलब्ध आहे. दिनांक १८ मार्च ला घडलेल्या विनाबुकिंग पर्यटन सफारी केल्याची खळबळजनक व धक्कादायक माहिती समोर आली होती त्या प्रकरणाची चौकशी करण्यास वनविभागा कडून चार दिवस होऊनही चौकशी न होता टाळाटाळ होत असून विलंब केल्या जात असल्याचे दिसते आहे.नाईट सफारीचा पर्यटन वाहने वनपरिक्षेत्र कार्यालयातून सोडली जातात मात्र सदर विनाबुकींग जिप्सी गेली ही माहिती जर वनाधिकारी वनकर्मचारी यांना माहिती नसेल तर पळसगांव नाईट सफारीचा सुरक्षा पुन्हा एखदा वाऱ्यावर आहे.
जर जिप्सी दुसऱ्या रस्त्याने गेली असेल तर ती गेट मधून गेली कशी,रात्राला गेट मधून खाजगी वाहनांना प्रवेश बंदी असते,तर ही बुकिंग नसताना जिप्सी ला जाऊ कशी दिली याचा शोध घेणे गरजेचे आहे. या पूर्वी बेलारा गोंडमोहाळी गेट मध्ये जिप्सीला चुकीच्या रस्ताने सफारी केल्याचा ठपका ठेवत गेट पंधरा दिवसासाठी पूर्णता बंद करण्यात आला होता,तर मागील २८ मार्च ला मदनापूर गेटवर चालक व गाईड मध्ये वाद झाला असता त्याना १ महिन्यासाठी निलंबित व जिप्सी ला आठ दिवसांसाठी निलंबीत चा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आदेश दिला आहे.
मात्र पळसगांव नाईट सफारी मध्ये चक्क जिप्सी विनाबुकिंग सफारी केली यावर अजूनही कारवाहीची गती मात्र शून्य दिसत आहे. ताडोबा वनपर्यटन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिप्सी चालकास व जिप्सीला तात्काळ ताडोबा वन पर्यटन क्षेत्रातून कायमस्वरूपी निलंबित करून पर्यटन नियमांचे सुरक्षा मध्ये व हयगय करणाऱ्या वनाधिकारी यांच्यावर वरिष्ठ वनाधिकारी यांनी सखोल चौकशी करून कारवाही करणे गरजेचे आहे. मात्र अजूनही कारवाही करण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हातील वरीष्ठ वनाधिकारी काय कारवाही करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—————————————
ताडोबा वाघ्र प्रकल्पातील नाईट सफारीतील जिप्सी प्रकरणाचा अहवाल वनपरिक्षेत्र अधिकारी यांचाकडून प्राप्त झाला येत्या दोन दिवसात चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल. श्री,बी,सी,येळे, सहायक वनसंरक्षक (जकास)ताडोबा बफर चंद्रपूर.