
प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे : – हल्ली गुन्हेगारांनी शेतक-यांना व ग्रामीण भागातील जनतेला फसवण्याचा व आर्थिक गंडा घालण्याचा एक नविन प्रकार सुरु केला. हया गुन्हेगारांचे राहणीमान हे पॉश असून ते या बोगस स्कीमव्दारे जनतेची आर्थिक फसवणुक करीत आहेत. हे गुन्हेगार ज्यांच्याकडे म्हशी, गाय, बैल, बोकड, कुत्रा इ. प्रकारचे जनावर ज्यांच्याकडे व जे पशु मालक आहेत त्यांच्याकडे जातात व या बोगस स्कीमचा प्रसार व प्रचार करतात व त्यात ते असा दावा करतात की, हल्ली एक नविन योजना आली आहे त्यात तुम्ही एक हजार रुपये आपल्या जनावरांच्या नावाने गुंतवा आणि जर ते जनावर ठरलेल्या कालावधीत मेले तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळतील.
या योजनेचा अधिक तपास केला असता असे आढळून आले की, अशी कुठलीही योजना सुरु नाही किंवा आलेली नाही तरी पशु मालकांनी अशा या बोगस व फसव्या स्कीमपासून सावधान रहावे असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील सुप्रसिध्द सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी यांनी तमाम जनतेला केले आहे.