
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने केवाडा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन १४ एप्रिल आणि १५ एप्रिलला विश्वशांती बुद्ध विहारच्या प्रांगणात करण्यात करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुरेश डांगे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून केवाडा ग्रामपंचायत सरपंच दीपिका गुरुनुले,पोलीस पाटील संजय वसाके,माजी सरपंच विलास राऊत, महादेव अंबादे,भीमाताई जांभुळकर,छबुताई कसारे, अरविंद जांभुळकर,पितांबर लाडे, अरुण लाडे, गोकुल सोनुले, प्रवीण टेम्भूर्णे आदी उपस्थित राहणार आहेत.मार्गदर्शक म्हणून सुशील राऊत, चंदू मेश्राम उपस्थित राहणार आहेत.
जयंती सोहळ्यानिमित्त रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,चालता बोलता प्रश्नमंजुषा स्पर्धा या विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.गावातील प्रमुख मार्गांनी रॅली काढण्यात येणार आहे. स्पर्धांतील बक्षीसपात्र स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहेत.कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा केवाडा यांचे वतीने करण्यात आले आहे.