
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील चिमूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्यादित नेरी र.ज.नं.२०१ या संस्थेतर्फे जाहीर करण्यात येत आहे, की संस्थेतर्फे रब्बी हंगाम उन्हाळी सन २०२३ धान खरेदी करीता दि.११-४-२०२३ पासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे,तरी ज्या कास्तकारांनी उन्हाळी धान पिकाची नोंदणी केली असेल त्यांनी नोंदणी करीता ७/१२ रब्बी नोंदणी असलेला,गाव नमुना ८ अ ,बँक पासबुक झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स,७/१२ वर एका पेक्षा अधिक नावे असतील तर संम्मतीपत्र, नोंदणी फार्म ईत्यादी कागदपत्र आणुन संस्थेत नोंदणी करुन घ्यावी.नोंदणी फार्म झेरॉक्स सेंटर मध्ये उपलब्ध आहेत असे आवाहन सभापती संजयभाऊ डोंगरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन कळविले आहे.