
तालुका प्रतिनिधी -शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात युवासेना तालुका प्रमुख पदी येवती येथिल युवा तडपदार शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते वृषभ दरोडे यांची नियुक्ती करण्यात आली तर युवासेना विधानसभा संघटक पदी करंजी (सो.)येथील अमोल राऊत यांची नियुक्ती करण्यात आली गेले कित्येक वर्षांपासून या शिवसैनिकांनी आपल्या पक्षासाठी एकनिष्ठ राहून गोर गरीब जनतेची कामे हाती घेऊन ती पूर्ण केली व गाव खेड्यात आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यास शिवसेना ठाकरे गटाला राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे यांना वेळोवेळी मदत केली,
म्हणूनच या यशस्वी कार्याचे फळ म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशावर युवा सेना सचिव वरून 47 विदर्भ संपर्कप्रमुख अरविंद सावंत तसेच विभागीय सचिव सागर भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार यवतमाळ जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यवतमाळ जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर व युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर युवा सेना उपजिल्हाप्रमुख मिथुन कुठे व शिवसेना नायगाव तालुकाप्रमुख विनोद काकडे यांच्या शिफारशीमुळे यवतमाळ येथे 9 एप्रिल ला शासकीय विश्रामगृहात नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे राळेगाव विधानसभा संघटक अमोल राऊत राळेगाव तालुका युवा सेना तालुकाप्रमुख दरोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.