
नियमित पाणी पुरवठ्यासाठी दिले निवेदन
पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा नगर परिषदेवर महिलेचा एल्गार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर शहरातील टिळक वॉर्ड. गांधी वार्ड येथील नळाला अत्यलप पाणी पुरवठा होत असल्यामुळे टिळक वॉर्डातील महिलांनी एल्गार पुकारला असून आज नगरपरिषदला निवेदन देण्यात आले. चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 व पाच टिळक वॉर्ड गांधी वार्ड या भागात एक महिण्यापासून नळाला अत्यलप प्रमाणात पाणी येत असल्याने पिण्याचे पाणी सुधा मिळणे कठीण झाले आहे.
त्यामुळे वॉर्डातील जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित होण्याची परीस्थिती निर्माण झाली असल्यामुळे वॉर्डातील महिला वर्गाना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या अगोदर चिमूर ग्राम पंचायत असताना सुधा कधी पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. परंतु नगर परिषद प्रशासनाच्या नियोजन शून्य ढिसाळ कारभारामुळे आज महिला आक्रमक होत एल्गार पुकारला असून आज पहिला टप्प्यात निवेदन देण्यात आले, तसेच शास्ती फी रद्द करण्यात यावे याबाबत चर्चा करण्यात आली.
नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दाखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. निवेदन देते वेळी माजी सरपंच लक्ष्मीकांत बावनकर, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचे नेतृत्वात सोनू बावनकर, पंचफुला वजरे. शितल कठाने. हर्षा बावनकर, मोना बनकर, संगीता बनकर. नंदा बनकर. वर्षा कोथोडे. प्रिया हरदास, मंजू चांदेलकर. ममता बनकर. व वॉर्डातील अन्य महिला उपस्थित होत्या.