Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपुरात आगमन

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या लोकार्पण सोहळ्याला राहणार उपस्थित

प्रतिनिधी -नागपुर

नागपुर:-नागपूर दि.26 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. २७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता जामठा परिसरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचा लोकार्पण सोहळा गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थित राहतील. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर खासदार कृपाल तुमाने, आमदार अॅड आशिष जायस्वाल, विभागीय
आयुक्त विजयलक्षमी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगर-
पालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनीही त्यांचे स्वागत केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर विद्युत महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राहुल रोकडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   चिमूर तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीने चंदू मडकवार यांनी …

स्मार्ट मिटर सक्तीला लावा लगाम वडकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) ने दिले निवेदन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- महाविजवितरण कंपनीने स्मार्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved