
प्रभात फेरी काढून पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आज दिनांक 29 एप्रिल रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा चिमूर येथे “शाळा पूर्वतयारी मेळावा” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य मार्गाने प्रभात फेरी काढून पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला पाटी न पेन्सिल घेऊ द्या की र या शाळापूर्व गीताने व घोषवाक्यानी ब बँड पथकासह मिरवणूक काढून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिमूर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देत शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटनप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचे हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी केंद्र प्रमुख महल्ले यांच्या उपस्थितीत चिमूर शहरातील मुख्य मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी नंतर शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात केली.
यावेळी मंचावर मुख्याध्यापिका छाया खोब्रागडे, सहायक शिक्षिका सरिता गाडगे, भाग्यश्री हिंगे, अश्विनी सातपुते, रुपाली जुमडे, सारिका नागोसे, सोनू बावनकर, निराशा नागोसे, वैष्णवी बावणे आदी उपस्थित होते.यावेळी सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांचे शाळापूर्व तयारी क्रमांक एक विकासपत्रावरील सर्व कृती विद्यार्थ्याकडून करून घेण्यात आल्या. यावेळी अंगणवाडी सेविका, विद्यार्थी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका छाया खोंब्रागडे, सूत्र संचालन सरिता गाडगे यांनी केले.