
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :–चिमूर महामार्गावरील रस्ता रूंदिकरणाचे काम सुरू आहे.सध्या रूंदिकरणाचे काम संताजी नगरपर्यंत आले आहे.नाली बांधकाम व रस्ता रुंदीकरण करित असतांना मुख्य रस्ता व जनतेचा जाण्या – येण्याचा मार्ग विस्कळीत झाला.हे दोन्ही रस्ते जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्लोप मारणे सुरू आहे.
पण स्लोप मारतांना फक्त गिट्टी पसरवित आहे त्यामुळे अनेकांचे अपघात होता -होता टळले आहे. गिट्टीमुळे अनेक गाड्यांचे टायर खराब झाले आहे.ह्या रस्त्यामुळे अनेक लोकांना ये- जा करित असतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार रस्त्यांची कल्पना देऊनसुद्धा दुर्लक्ष केल्या जात आहे.तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने पक्या सिमेंटचा उतार काढुन देण्याची मागणी संताजी नगर वासियांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.