
वडकी पोलिस स्टेशनला केली तक्रार दाखल
तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे,राळेगाव
यवतमाळ:-राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील महिलेला ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून,तालुक्यातील दहेगाव येथील बचत गटातील २५ ते ३० महिलांची प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेवन्ता उद्धव जिकार रा. दहेगाव यांनी एका फसवणूक करणाऱ्या महिलेच्या विरोधात वडकी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
फसवणूक करणारी महिला प्रिया राठोड हिने दहेगाव येथे महिलांच्या घरी जाऊन बचत गटाच्या नावाने प्रत्येक महिलेला ५० हजार रु कर्ज मिळवून देण्याचे आमिष दिले,व स्टॅम्प पेपर खर्च म्हणून गावातील मोलमजुरी करणाऱ्या अनेक महिलांकडून रुपये दोन हजार प्रमाणे घेऊन कर्ज देण्याचे आमिष दाखविले.
यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वडकी पोलिसांकडे धाव घेऊन ठाणेदार विजय महाले यांचेकडे तक्रार दाखल केली.ह्यावेळी मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष शंकर वरघट,युवराज चटकी यांच्या उपस्थितीत शेवंता उद्धवजी जिकार ,मनीषा किशोर राऊत, सिंधू देवराव हरबडे, मंगला बबन बोभाटे, शीला वामन इटाळे, सुनिता नागो काटकर,शांताबाई मांडवकर,हिना जाकीर शेख, तुळसाबाई मारोतराव काटकर, वैशाली रमेश धंदरे,सोनाली दिनेश बोरेकर, सुरेखा वसंतरावजी चटकी आदी असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या.