
जिल्हा प्रतिनिधी:-सुनिल हिंगणकर
चिमूर/नेरी:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामधिल नेरी येथील मुख्य बाजार चौकातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी कोणाचेही लक्ष लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नेरी येथील रस्त्याच्या रुंदीकरणाची व नव्याने सिमेंटीकरण करण्याची नागरिकांची मागणी आहे मात्र लोकप्रतिनिधीचे आश्वासन हवेत विरले काय ? असा प्रश्न गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नेरी पि.एच.सी. चौकापासून गावांमध्ये येण्याकरीता हा एक मुख्य मार्ग असून बऱ्याच वर्षांपासूनचा हा सिमेंट रस्ता जागोजागी ऊखरला असून, खड्डे पडलेले अवस्थेत आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्याने जातांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.जनप्रतिनिधी मुळे हा रस्ता आपल्या दुरुस्ती साठी अश्रू ढाळीत आहे. ना काही देने घेने वाटत नाही अशी प्रतिक्रिया गावातील नागरिक व्यक्त करतांना दिसत आहे, या रस्त्याचे त्वरीत नव्याने सिमेंटीकरण करुण रुंदीकरण करावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तरी प्रशासनातील संबंधीतांनी लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे.