
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे:-सध्या तुम्हाला + ८४, +६२, +६० अशा विविध आंतरराष्ट्रीय नंबरवरुन कॉल येत असतील तर त्यांना ब्लॉक करा कारण हे कॉल म्हणजे सायबर गुन्हेगारांनी नागरीकांना रचलेला एक नविन सापळा आहे. त्यासाठी हे व्हॉटस् कॉल रिसीव्ह करु नका. सायबर गुन्हेगार हे मैसेजिंग प्लेटफॉर्मचा उपयोग करुन लोकांना आमिष दाखवतात आणि लोकांना फसवतात, कारण मैसेजिंग प्लेटफॉर्म हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे तसेच व्हॉटस् अॅपवरुन हे प्रकार जास्तीत जास्त होतात.
म्हणून व्हॉटस् अॅपवरुन आलेल्या कॉलला रिसीव्ह करु नका तसेच आलेल्या मॅसेजच्या लिंक वर क्लिक करु नये कारण त्या मॅसेजमुळे तुमची वैयक्तिक तसेच गोपनीय माहिती ही संबंधित सायबर गुन्हेगारांकडे जाते. त्याव्दारे हे सायबर गुन्हेगार आपली आर्थिक फसवणुक करतात. यासाठी अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलला रिसीव्ह करु नका. तसेच त्यांना ब्लॉक करुन रिपोर्ट करा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे व नागरीकांना आवाहन केले आहे की, जर आपल्या सोबत अशी फसवणूक झाली असेल तर त्वरीत www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा १९३० या टोलफ्री नंबरवर तकार करा अशी माहिती अॅड. चैतन्य भंडारी यांनी दिली आहे.