Breaking News

हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :-सन 2023 मध्ये हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 17 व 18 मे 2023 रोजी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.

सदर शिबीरामध्ये सि.बी.सी., एल.एफ.टी., के.एफ.टी., ब्लडशुगर, रक्तदाब व एक्सरे इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून ओरल पोलिओ लस, मेनिंजायटीस प्रतिबंधक लस, 65 वर्षांवरील व्यक्तींना सीझनल इनफ्लूएंझा लस देण्यात येणार आहे. तरी सर्व हज यात्रेकरूंनी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या एन.सी.डी. ओपीडी येथे शिबीराचे दिवशी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved