
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील सलुन व्यवसायीकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि 6-6-23 ला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली, अनिल शालीकराम बारसागडे वय 38 वर्ष यांनी नेरी ग्रामपंचायत समोर सात वर्षापासुन सलुनचा व्यवसाय करीत होते.ते नेरी येथील मेंढुलकर परिवारातील जावई होते
त्यांचे मुळगाव निमगाव जिल्हा गडचिरोली येथील होते.ते सात वर्षांपासून फुले नगरात स्वताचे घर बांधुन परिवारासहित राहात होते.
दुकान सुरु असतांनि त्यांचा मुलगा येवुन बघितले असता अनिल बारसागडे याने गळफास लावुन आत्महत्या केल्याचे दिसले घटनेचि वार्ता पसरताच लोकांची गर्दि उसळली घटनेची माहिती मिळताच पोलीसांनि घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला व प्रेत उत्तरिय तपासनिसाठि चिमुर उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. त्याचे परिवारात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे,पुढील तपास चिमुर पोलिस करित आहे.