Breaking News

विवाहित महिलेचा विनयभंग करणारा डॉक्टर पोहोचला कारागृहात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

कुरखेडा:-कुरखेडा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी रुग्ण औषधोपचारासाठी ग्रामीण भागातून खाजगी दवाखान्यात येत असतात.अशातच एक महिला कुरखेडा येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असतांना खाजगी दवाखान्याचे डॉक्टर यांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ.जिबन हिरा यांचे क्लिनिक (दवाखाना) आहे. ग्रामीण भागातील एक महिला पंधरा दिवसापासून डॉ. जीबन हिरा यांच्याकडे उपचाराकरिता येत होती.परंतु डॉ.उपचाराबहाने महिलेशी अश्लील चाळे करत असे. डॉक्टर चा हा त्रास वाढल्याने महिलेने संतापून पतिस सांगितले असता दोघेही पती पत्नी दवाखाना गाठला.

मंगळवार 13 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ग्रामीण भागातील महिला तपासणी करिता आली होती. मात्र यावेळी औषधोपचार न करता वाईट हेतूने डॉक्टर छेड काढत असल्याचे महिलेला जाणवताच सदर डॉक्टरला दवाखाण्यातच महिलेने बदडून काढले. दरम्यान महिलेसोबत आलेल्या तिच्या पतीनेही चांगला चोप दिला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी संगितले. यावेळी त्यांच्या तावडीतून सुटत घराकडे सदर डॉक्टर ने पळ काढला. त्याला येथील आंबेडकर चौकात ही चोप बसल्याची माहिती आहे.

सदर घटनेनंतर महिलेने पोलीस स्टेशन कुरखेडा गाठून तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी डॉ. जिबन हिरा ( 28 ) याच्या विरोधात भादवि 354, 354 (अ) 354 (ब) अन्वये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. आज त्याला न्यायलयात हजर करण्यात आले असता न्यायलयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असून चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शितल माने करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संकटात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले चंद्रपूरचे प्रकल्प कार्यालय

एक लक्ष रुपयांची तात्काळ मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे बकऱ्या …

जिल्हा परिषदेच्या 24 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत एकूण 24 जिल्हा परिषद शाळांत सेमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved