
४ लहान मुले व एका व्यक्तीचा जीव जाता-जाता बचावला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यातील जांभुळघाट जवळील बोळधा नदी पात्रात JCB च्या सहाय्याने खड्डा करून त्याठिकाणी मोटारपंप लावून शेतीला पाणी करीत असतांना इलेक्ट्रिकची वायर लिकेज असल्याकारणाने पाण्यात विद्युत प्रवाह निर्माण होऊन ९ बकऱ्या २ बकरे जागीच ठार झाले.अशी ही दुर्दैवी घटना घडली.हि शेती कापगते यांची असून तेच शेतीला पाणी करीत होते. हि घडलेली घटना दिनांक १७ जून २०२३ ला सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ची आहे.
याच ठिकाणी ४ अल्पवयीन मुले व पोहण्यासाठी गेली असता तेही बचावली तसेच बकरी चराई करणारा राखणदार हाही थोडक्यात बचावला व त्यावर उपचार सुरू असून भिसी पोलीस स्टेशन हद्दीतील हा प्रकार असून पोलिसांनी तपास करीत सर्व बकरी मालकांना पोलीस स्टेशन येथे बोलावीत त्यांचे बयान नोंदविण्यात आले आहे.
या घटनेने तालुक्यात सर्वत्र चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी हि म्हण जणू अक्षरशः सत्य ठरली आहे.या बकऱ्या एका मालकीच्या नसुन ८ ते ९ जणांच्या आहे.यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.तसेच MSEB ने याकडे लक्ष देत सर्व मोटारपम्प लाईन ची तपासणी करावी अशीही मागणी केली जात आहे. जेणेकरून पुढे अशाप्रकारे पुन्हा अशी हानी होऊ नये.