
मुरुम ऎवजी बांधकामामध्ये माती चे काम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-चिमूर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत येत असलेल्या जागेवर कोट्यवधी रुपयांचे खडसंगी बफर कार्यालयाचे कर्मचारी (STPF) वन वसाहतिच्या ९ इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परंतू यामध्ये वापरले जाणारे मटेरियल तसेच पायव्यामध्ये मुरुम ऎवजी माती वापरली जात जात असून जास्त काळ या इमारती टिकू शकणार नाही.
या इमारतीच्या बांधकामाची चौकशी इंजिनिअर कशाप्रकारे करीत असेल असा प्रश्न जनतेला पडला आहे. वर्ष होत नाही तर शासकीय इमारतीला भेगा पडायला सुरुवात होते.हे जिवंत उदाहरण आहे. या इमारतीच्या बांधकामामध्ये बफर वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेही साटेलोटे असल्याचे यावरून स्पष्ट होते. म्हणून वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष द्यावे व जेणेकरून निकृष्ट दर्जाचे काम हे इस्टीमेट नुसार व्हावे आणि शासकीय निधीचा योग्य वापर व्हावा अशी जनतेची अपेक्षा आहे.