Breaking News

धक्कादायक- सिरपुर येथील घटना इलेक्ट्रिक करंट लागून युवकाच्या जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी पासून जवळच असलेले सिरपुर येथील युवकाचा नवीन मकानाला पाणी टाकून झाल्यावर पाण्याच्या मोटारपंप चा वायर गुंडाळताना कटलेल्या वायर ला स्पर्श झाल्याने जोरदार झटका बसला आणि हातात वायर घेऊन जागेवरच त्याचा मृत्यू झाला.

सिरपुर येथील धनराज शामराव गावतुरे वय ३८ वर्षे असे मृतकाचे नाव असून त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे सदर घराला पाणी देण्यासाठी जवळील विहिरीवर मोटारपंप लावला आहे त्या मोटारपंप चा कनेक्शन त्यांच्या घरात असून पंप सुरू करून मकानाला सकाळी १० वाजताच्या सुमारास पाणी दिले, त्यानंतर पाणी देऊन झाल्यावर मोटरपंपची स्विच बंद करून पंप बंद केले.

परंतु घरातील बोर्डावरील बटन बंद करण्याचे विसरले आणि पाऊस सुरू असल्याने मोटारपंप जवळून वायरची गुंडाळी करण्यासाठी वायर गुंडाळीत असताना वायर कटलेला असल्याने वायर कटलेल्या जागेवरून हाताला स्पर्श होताच धनराजला जोरदार झटका बसला वायर हाताला चिकटून धाडकन खाली पडला व जागेवरच ठार झाला जवळच पहिल्या वर्गात शिकत असलेला त्याचा मुलगा होता वडील पडलेले पाहून तो जोरदार बाबाला करंट लागला म्हणून ओरडत बाहेर पडला असता जवळील नागरिकांना व घरातील मंडळीला घटनेची माहिती मिळाली तात्काळ नागरिक गेले असता.

घरातील कनेक्शन बंद करून बोर्डातील वायर काढले असता धनराज मृत्यू पावल्याचे कळले लगेच पोलीस पाटील मंगेश भानारकर यांनी चिमूर पोलीसांना माहिती दिली तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले पोलीस निरीक्षक जांभुळे , शिपाई वाढई, मोहूर्ले यांनी प्रेताचे पंचनामा करून प्रेत तपासणीसाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून सिरपुर गावात तरुण युवकाचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे धनराज गावतुरे यांच्या अचानक मृत्युमुळें त्यांच्या कुटूंबियावर आस्मानी संकट कोसळले आहे त्यांच्या पचश्यात एक मुलगा एक मुलगी पत्नी आई बहीण बराच मोठा आप्तपरिवार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved