Breaking News

चालक पळाला ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून

6 लाख 55 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर / सिंदेवाही :-चंद्रपुर जिल्ह्यातील रेती घाटावर उपसा सुरूच, आजही रेती माफिया मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळुचे उत्खनन करीत आहे‌‌. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, सावली व पोम्भूर्ना हे अवैध वाळू माफियाचे रेती उत्खननाचे हब बनले आहे.

सिंदेवाही तालुक्यात कळमगाव मार्गाने जाणाऱ्या रोडवर शासनाचा विना परवाना अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वाहन क्रमांक MH-34 , BV-7646 आणि नंबर नसलेली ट्रॉली असा एकूण अंदाजे 6 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असुन ट्रॅक्टर आणि ट्रॉली – जप्त करण्यात आली आहे.

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा चालक ट्रॅक्टरसह ट्रॉली सोडून पळुन गेल्याची माहीती पोलीसांनी दिली आहे. तसेच सिंदेवाही पोलीस विना परवाना शासनाची रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकाचा शोध घेत आहेत.  सिंदेवाही पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार तुषार चव्हाण पुढील तपास करीत  आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved