Breaking News

चंद्रशेखर घुले गेले अजित पवारांच्या गटात???

विशेष पत्रकार – अविनाश देशमुख शेवगांव
9960051755

◻️ माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आज (गुरुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पाठिंबा दर्शविल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. ⏰ चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. नगर जिल्हा सहकारी बँकेतील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचा केवळ एका मताने पराभव झाला होता. त्यामुळे ते नाराज होते.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. सध्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात आहेत. तर चंद्रशेखर घुले यांनी आज अजित पवार यांना भेटल्याने त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. चंद्रशेखर घुले यांची मोठी मुलगी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची पत्नी आहे. आशुतोष काळे यांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved