Breaking News

शेवगांव नगरपरिषद चा आरोग्य विभाग साखर झोपेत सभागृह नसल्याने जाब विचारणारे कोणी नाही शेवगावकरांची आरोग्याची वरात वाऱ्या वर???

विशेष पत्रकार – अविनाश देशमुख शेवगांव
9960051755

शेवगांव:- गेले कित्येक महिने शेवगांव शहरातील साफसफाई घनकचरा व्यवस्थापन स्ट्रीट लाईट देखभाल दुरुस्ती आणि अंडरग्राउंड गटारीचे साफसफाई आणि डागडुजी झालीच नाही नळाला पाणी सुटले की गटारात आणि तेच गटारीचे पाणी साऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी पिण्याची पाईपलाईन जीर्ण झाली असुन सुकते पन्नास वर्षांपुर्वी झालेली लाईन शेवटच्या घटका मोजत आहे आधी पिण्याची पाईपलाईन मग अंडरग्राउंड गटारी मग स्ट्रीट लाईट आणि मग रस्ते व्हायला पाहिजे होतें पण गेल्या आठ वर्षांमध्ये नगरपालिका स्थापन झाल्यापासुन शहरातील सर्व विकासकामे उलट्या क्रमाने झाल्याने शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया गेल्या सारखी परिस्थिती आहे.

शेवगावकरांना “भीक नको पण कुत्र आवर” म्हणण्याची पाळी आली आहे सगळीकडे साचलेले उकांडे वाढलेले काटवन शहरात चौकाचौकात झालेले अतिक्रमण दुकानदारांचे रस्त्यांवरील अतिक्रमण धनदांडग्यांनी लाटलेले पालिकेचे ओपन प्लेस सरकारी मालकीचे भूखंड “एक ना धड भराभर चिंध्या” अशी बकाल अवस्था शहराची झाली आहे शहरात अनेक विकास पुरुष होऊन गेले पण शहाराचा विकास काही झाला नाही गेल्या तीन वर्षांपासुन नगरपरिषदेला जाब विचारणारे कोणी नाही त्यामुळे सगळा मनमानी कारभार सर्वसामान्य शेवगांवकर गपगार

ताजा कलम

मध्यंतरी शेवगांव नगरपरिषदेचे कार्यालय शहरात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले शेवगांव तहसील कार्यालयाच्या ईमारतीत तात्पुरते शिफ्ट होणार असल्याचे जोरदार चर्चा झाली पण कोठे माशी शिंकली काय माहित??? अबाल वृद्ध महिला आणि सर्वसामान्य नागरिक याना शहरापासून दूर असणाऱ्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात पाण्याच्या टाकीजवळ गावात काही कारभार घरकुल आणि जन्ममृत्यू दाखले व ईतर कारभार प पैठण रोडच्या क्रीडा संकुलात शोले पिक्चर सारखे झाले “आधे ईधर जाओ आधे उधर जावं बाकीके मेरे पीछे आव”

क्रमशः

मागील साचलेल्या कचरा डेपोवरील घातक घनकचऱ्याचे बायोमायनिंग आणि विघटन न करता एका जुन्या एजंसी ने घेतले लाखो रुपयांचे बिल शहरात चर्चा किसने किया खर्च

पत्रकार – अविनाश देशमुख, व
सामाजिक कार्यकर्ता शेवगांव

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर विद्युत महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राहुल रोकडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   चिमूर तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीने चंदू मडकवार यांनी …

स्मार्ट मिटर सक्तीला लावा लगाम वडकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) ने दिले निवेदन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- महाविजवितरण कंपनीने स्मार्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved