Breaking News

वरूड जहांगीर मध्यम प्रकल्पाच्या भिंतीला पोखरून तयार केली दरी

गावकऱ्यात भितीचे सावट, ताबडतोब चौकशीची मागणी

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे झाडगाव परिसरात मोठे गाव असून या गावात शेतकरी शेतमजूर भरपूर प्रमाणात आहे. याच वरूड गावात पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मध्यम प्रकल्प झाला असून या तलावाला त्यावेळी शासनाच्या अधिकारी वर्गानी एकच कालवा दिला आहे.त्यामुळे या तलावाचा वरूडच्या शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा झाला नसला तरी हा तलाव जंगलाला लागून असल्याने या तलावात पाण्याचा साठा लवकरच होतो.अशातच या गेल्या उन्हाळ्यात या विभागाने नाल्यात पाणी सोडले नसल्याने आता सध्या पाणी साठा बऱ्यापैकी असून बाकी पावसाळा शिल्लक आहे अशातच या तलावावर खूप मोठ्या प्रमाणात भिंतीला लागून झाडझूडपे वाढली असल्याने या झाडाझूडपाच्या आधाराने जंगली प्राण्यांचा मुक्त वावर वाढला असल्याचे दिसून येत असून या भिंतीला आडवी पोकळी तयार झाली असून.

ती कुठल्यातरी जंगली प्राण्यांची गुहा असल्याची शंका असून ती भिंतीतून आडवी पोखरली असून ती दरी कीती दुरपर्यंत पोखरली गेली आहे याचा अंदाज बांधता येत नसून तेथे खूप झाडेझुडपे असल्याने एक किंवा दोन मानसे जायची हिंमत करत नाही.अशातच पावसाळा सुरू असल्याने ही पोकळ दरी त्यात राहणारे प्राणी आरपार पाडणार नाही ना अशी भीती गावकऱ्यांच्या मनात तयार झाली असून ही दरी मध्यम प्रकल्प विभागाचे कर्मचारी दिनांक 11/7/2023 ला पाहून गेले असून आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवितो असे सांगून गेले. असून या प्रकरणी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष वेधून या दरीत नेमके काय आहे आणि ती दरी कुठपर्यंत पोहोचली आहे याची ताबडतोब चौकशी करून याचा सोक्षमोक्ष लावून गावकऱ्यांना भयमुक्त करावे अशी विनंती खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते, वसंत जिनिंग राळेगावचे संचालक रामधन राठोड, शिंदे गटाचे हनुमान शिवरकर ग्रामपंचायत सदस्य भानूदास चव्हाण, ग्राम पंचायत सदस्या ज्योत्स्ना उईके,जनार्दन कडू, सदानंद भोरे, शेषराव भोरे,शंकर मेश्राम, उत्तम मेश्राम, गजानन सोनटक्के, उत्तम भोरे, दशरथ भोरे,पुनेश्वर उईके,किरण निमट, अरविंद उईके, शेषराव उईके, पुंडलिक आत्राम, गजानन ठाकरे, सुदाम राठोड, बळीराम जाधव,मधूकर जाधव,मोतीसिंग वडते, प्रविण वडते,राहूल वडते, जयसिंग वडते, नामदेव जाधव, तुळशीराम वडते, निलेश वडते, सुरेश राठोड, मनोहर राठोड, मारोती चहारे, शरद आडे,विष्णू राठोड,मनोज राठोड,कवडू राठोड, गजानन राठोड, प्रकाश जाधव, विनोद जाधव इत्यादी गावकऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर शहरात ले आऊट मालका कडून शासकीय नियम धाब्यावर – मुलभूत सुविधेचा अभाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध …

चंद्रपूर जिल्हा 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved