Breaking News

चिमूर पोलिसांनी आवरल्या चोरांच्या मुसक्या

“चोरीसाठी वापरल्या गेली स्विफ्ट डिझायर चार चाकी वाहन”

“मोबाईल फोनसह दोन आरोपीला पोलीसांनी केली अटक”

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर:- पोलीस स्टेशन चिमूर येथे दिनांक 14/07/2023 शुक्रवारला राजू पांडुरंग नंदनवार यांनी तोंडी रिपोर्ट दिली की चिमूर आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करीत असताना त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशात असलेला वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन किंमत 15,000/- रुपये असून कोणीतरी सायंकाळी 06/30 वाजताच्या सुमारास
चोरी केला. या मोबाईल कव्हरच्या मागे त्यांचे आधार कार्ड असून मोबाईल चोरी केल्याबाबत पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रार दाखल केल्याने पोलीस स्टेशन चिमूर येथे अप क्रमांक 232/2023 कलम 379 भादवि अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेणे करिता तपास पथक रवाना करण्यात आले असता त्यांना हजारे पेट्रोल पंप येथे संशयित चार चाकी वाहन स्विफ्ट डिझायर क्रमांक MH-40-Y-6496 हे दिसून आले सदर वाहनाची झडती घेणे करिता वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालकाने त्याचे वाहन घेऊन उमरेड रोडनी पळून जात असता पोलीस पथकांनी त्याचा पाठलाग करून सदर वाहनास न्यू राष्ट्रीय शाळेजवळ थांबवून सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनांमध्ये नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल वन प्लस कंपनीचा मिळून आला.

तसेच त्या व्यतिरिक्त इतर तीन मोबाईल हँडसेट मिळून आल्याने वाहनामध्ये असलेले आरोपी नामे धर्मेंद्र गणेश दास कुरील वय 55 वर्ष, रा. रविदास नगर येरखडा कामठी जिल्हा नागपूर, आरोपी बलराम कुमार चंद्रदेव महतो,वय 20 वर्ष, रा. महाराजपुर जिल्हा साहेबगंज झारखंड, हल्ली मुक्काम कळमना वस्ती नागपूर याच्याकडून पोलीस स्टेशन चिमूर येथील अप क्र. 232/2023 कलम 379 भादवी मधील चोरीस गेलेला मोबाईल व इतर तीन मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली चार चाकी स्विफ्ट डिझायर असा एकूण 2,95,000/-रुपयेचा माल हस्तगत करण्यात आला.

पुढील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, तथा पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोरते, पोहवा विलास निमगडे, पोलीस अमलदार सचिन खामनकर, शैलेश मडावी, सचिन साठे, विनायक सरकुंडे, विशाल वाडई यांनी यावेळी पार पाडली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved