Breaking News

ऐतिहासिक महादेव मंदिरातील दानपेटी फोडुन हजारो रुपये चोरटयांनी लांबवीले

पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

विशेष पत्रकार-अविनाश देशमुख शेवगांव
9960051755

शेवगांव:-शेवगांव शहरात दंगल झाल्यापासून चित्र विचित्र घटना घडत असुन काही दिवसांपूर्वी धनगर गल्ली मधील पुरातन महादेव मंदिरात चोरटयांनी पाळत ठेऊन दानपेटी फोडुन हजारो रुपयांचा ऐवज चोरला यां संधर्भात शेवगांव पोलीस स्टेशन मध्ये महादेव भक्त जगदीश शेठ धूत आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील उर्फ बंडूशेठ रासणे व परिसरातील नागरिक यांनी गुन्हा दाखल केला असुन अतिशय गजबजलेल्या आणी कायम रहदारी असलेल्या मारवाड गल्ली धनगरगल्ली यां परिसरातील ऐतिहासिक महादेव मंदिरामधील दानपेटी फोडुन हजारो रुपये अज्ञात चोरटयांनी लांबवीले शेवगांव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला.

असुन चोरटयांनी दानपेटी फोडुन रोख रक्कम लांबविली चिल्लर आणि दानपेटी तिथेच टाकुन पळ काढला आधीच यां परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेली दंगल त्यानंतर बलदवा दरोडा व भीषण हत्याकांड नंतर स्व. कचरूशेठ धूत यांच्या घरी दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न आणि आता महादेव मंदिरात चोरी त्यामुळे परिसरातील नागरिक महिला अबाल वृद्ध भयभीत आहेत यां चोरीचा तपास शेवगांव पोलीस स्टेशन चे पी. आय. विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगांव पोलीस पुढील तपास करत आहेत.

*ताजा कलम*

गेल्या काही दिवसांपासुन काही परप्रांतीय लोक यां भागात संशयित अवस्थेत गृहपयोगी वस्तु विकताना अवेळी अवेळी फिरत आहेत परिसरातील लोकांनी त्यांना जाब विचारून हाकलुन दिले व यां संधर्भात शेवगांव पोलीस स्टेशन ला तक्रार केली आहे यां भागात नागरिकांनी व माहेश्वरी युवक मंडळाच्या कार्यकत्यांनी व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते भगवान शेठ धूत यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची गस्त सुरु केली आहे यां पार्श्वभूमीवर शेवगांव पोलिसांनी शहरात काही संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे

*विशेष बाब*

यां मंदीर परिसरात काही भामटे स्थानिकांनी संशयास्पद परिथितीत फिरताना पहिले आहेत चोरी त्यांनीच केली असेल असा दाट संशय व दबक्या आवजात चर्चा सुरु आहे पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ???? ते भामटे कोण विचत्येत “मी शेवगांवकर”

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved