Breaking News

वडकी पोलीस स्टेशनचा संदेश पूर्ण उपक्रम

आक्सिजन पूरक वृक्षांची लागवड करून जोपासाला पर्यावरणाचा समतोल

प्रत्येकानी घरी,शेतात किमान एक झाड तरी लावावे ठाणेदार -विजय महाले

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-राळेगाव तालुक्यात येणाऱ्या वडकी पोलिस स्टेशन मध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीचे विशेष महत्त्व असून पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन मध्ये स्टेशनचे कार्य तत्पर कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले व त्यांचे सहकारी पोलीस यांनी पोलीस स्टेशनच्या पटांगणात विविध वृक्षांची लागवड केली.

आज जिकडे तिकडे झाडांची कटाई सुरू असून नवीन झाडे लावण्याकडे कल कमी दिसतो मात्र याला अपवाद वडकी पोलीस स्टेशन ठरत असून या वडकी स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांनी आपल्या पोलिस सहकाऱ्यासह पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून सर्वात जास्त ऑक्सिजन उत्सर्जन करणारा वृक्ष वड, निंब या वृक्षाबरोबरच पिंपळ, नारळ, जांभूळ, आंबा तसेच बांबू व अशोका या झाडांची पोलीस स्टेशन परिसरात लागवड केली. तसेच ह्या झाडांचे व्यवस्थित संगोपन करून मोठी करण्याची जबाबदारी वडकी पोलीस स्टेशन ठाणेदार व सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved