जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- मणिपूर येथे जमावाने दोन महिलांना नग्न करून परेड केल्याचा व्हिडिओ पाहून देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे देशात संतापजनक वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा संताप चंद्रपूर येथे व्यक्त करण्यात आला आहे.
भाजप वगळता सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून केंद्र सरकारचा विरोधात घोषणा दिल्या जात आहे. मणिपूर येथील मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मणिपूर आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस व ग्रामीण, चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा(जी.सी.) यांना संयुक्त निवेदन देण्यात आले.
मणिपूरमध्ये मागील चार महिन्यापासून हिंसाचार धुमसत आहे. पण पंतप्रधान आतापर्यंत यावर काहीही बोलले नाही काल महिलांवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यावर केवळ ८६ सेकंद पंतप्रधान यावर बोलले. मणिपूर मध्ये देखील भाजप चे सरकार आहे पण तिथे भाजप चे मुख्यमंत्री बिरेन सिंग हिंसाचार रोखण्यात असफल झाले आहे. ज्या देशात महिलांना देवी मानले जाते त्या देशात महिलांची अशी नग्न धिंड काढल्या जात असेल तर नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत या संबंधी निवेदन द्यावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या संघटनेच्या महिला अध्यक्षांनी केली. महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य-ठेमस्कर, चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या महिला जिल्हा संघटक उज्वला नलगे यांच्या नेतृवात हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनला चंद्रपूर महिला काँग्रेस च्या तालुका अध्यक्ष शितल कातकर, उपाध्यक्ष लता बारापात्रे, उपाध्यक्ष मुन्नी मुमताज शेख, उपाध्यक्ष वाणी डारला, महासचिव मीनाक्षी गुजरकर, सचिव माला माणिकपुरी, राष्ट्रवादी काँग्रेस च्या विधानसभा अध्यक्ष शुभांगी साठे,तालुका अध्यक्ष वनिता माऊलीकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पूजा शेरकी, जिल्हा सचिव निर्मला नरवाडे, सचिव सरस्वती गावंडे, शिवसेना महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष वर्षा कोठेकर, शिवदूत निलिमा शिरे, कुसुम उदार, किरण वानखेडे, श्रुती कांबळे, मेहेक सय्यद, वैशाली जोशी, मंगला शिवरकर, सोनाली चंडुके, रजनी उईके, सुनीता मडावी, सुरेखा ठाकरे, पपिता गोहणे, साधना चांदेकर, चंद्रपूर सोशल मीडियाचे अध्यक्ष मुन्ना तावाडे, नरेंद्र डोंगरे, प्रकाश देशभ्रतार यांच्या सह महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते.