बॅनर पोस्टर तथा कोणत्याही प्रकारे वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ:-पुरामुळे आलेल्या संकटाने अनेक नागरिकांचे जीवन उध्वस्त झाले यामुळे उपजिल्हा प्रमुख शिवसेना तथा प्रेरणा अध्यक्ष डॉ विष्णु उकंडे यांचा वाढदिवस बॅनर पोस्टर तथा इतर कोणत्याही प्रकारे साजरा न करता बोरगाव पुंजी येथील घरात पाणी जाऊन घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना धान्य किट वाटप शिवसेना ,डॉ विष्णू उकंडे मित्र मंडळ तथा प्रेरणा संस्थेच्या वतीने आर्णी तालुका प्रमुख शिवसेना राजेन्द्र जाधव तथा बोरगाव पू च्या सरपंच दुर्गा ताई उईके तथा पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडून शेकडो एकर जमीन खरडून गेली,उध्वस्त झाली ,त्याच प्रमाणे शेकडो घरात पाणी जाऊन घरातील सर्व साहित्य निकामी झाले,असता शिवसेना आर्णी तालुका,डॉ विष्णू उकंडे मित्र मंडळ तथा प्रेरणा संस्थेच्या वतीने डॉ. विष्णू उकंडे यांचा वाढदिवस बॅनर पोस्टर तथा इतर कोणत्याही प्रकारे साजरा न करता बोरगाव पुंजी येथील पुराच्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला धान्य किट देऊन सामाजिक भान राखले,यावेळी आर्णी तालुका प्रमुख राजेन्द्र जाधव, सरपंच दुर्गा उईके,उपसरपंच प्रीती निकम शहर संघटक श्याम ठाकरे, उपतालुका प्रमुख प्रवीण चव्हाण,अनिल तिवारी ,भारत पवार, उपशहर प्रमुख मनोज चारोळे लोकमत चे पत्रकार चिंतामण चहांदे, युवा सेना उपतालुका प्रमुख खुशाल राठोड,सुरेश जयसिंग पुरे ,अर्जुन मेश्राम, सुदाम उईके,पांडुरंग जाधव,वसंता पवार,प्रकाश जाधव,अंबादास राठोड ,प्रेरणा संस्थाचे संतोष घोगेवाड, विक्रम राठोड हेमराज बुचके तथा ग्रामस्थ उपस्थित होते.