Breaking News

पत्रकारांच्या विविध मागण्याघेऊन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचा मंत्रालयवर धडक मोर्चा

जिल्हा प्रतिनिधि-शशिम कांबळे

यवतमाळ:-भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतोष निकम सर यांच्या नेत्रृवात, वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनात दिनांक 3 ऑगस्ट रोजी मंत्रालयात मुंबई येथे धडक मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते राज्य भरातून आलेल्या पत्रकारांची एकच गर्दी बघायला मिळाली. प्रामुख्याने राज्यात सातत्याने होत असलेल्या पत्रकारांवरील हल्ले तसेच शासकीय अधिकाऱ्याकडून भा.द.वि.कलम ३५३ सारके खोटे गुन्हे दाखल करन्यात येतात ते रद्द करून विविध मागण्या मंजूर करण्यात याव्या यासाठी आंदोलन करण्यात आले. यामध्ये निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर भ्रष्टअधिकारी व कर्मचाऱ्यांकडून भा.द.वि. कलम 353 चा दुरुपयोग करण्यात येतो.

तसेच पत्रकार बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे या कलमांचा धाक टाकून पत्रकारांना निर्भीडपणे पत्रकारिता करण्यापासून रोखले जाते त्यामुळे कलम 353 मधून पत्रकारांना वगळण्यात यावे व राज्यात ज्या काही पत्रकारांवर 353 सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावे, सध्याचे डिजिटल युग असून मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, इंटरनेट याचा देशात मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे जनतेने youtube न्यूज चॅनलला प्रसार माध्यम म्हणून स्वीकारले आहे त्यामुळे youtube चैनल ला पत्रकारितेमध्ये समाविष्ट करून त्यांचे अधिकृत प्रसार माध्यम म्हणून नोंद व्हावि व त्यांना अधिकृत प्रसारमाध्यम म्हणून मान्यता मिळावी, पत्रकार प्रवास करत असलेल्या वाहनांना राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफी मिळावी, रेल्वे मध्ये पत्रकारांना मोफत प्रवेश मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडून पाठपुरावा करण्यात यावा, शिक्षक पदवीधर व राज्यपाल नियुक्त आमदाराप्रमाणे राज्यातील नोंदणीकृत पत्रकार संघटनांना विश्वासात घेऊन राज्यपाल नियुक्त पत्रकार आमदारांचे निवड करण्यात यावे.

राज्याचे प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घरे देण्यात यावे, तालुक्यात पत्रकार भवन बांधून त्यात पत्रकार विश्रामगृह, प्रेस कॉन्फरन्स, व मीटिंग हॉल बांधण्यात यावे, अधिकृत नसणाऱ्या राज्यातील सर्व पत्रकारांचे सरसकट नोंदणी जिल्हा माहिती कार्यालयात करण्यात यावे, राज्यातील शासकीय विश्रामगृह व एमटीडीसी मध्ये पत्रकारांना प्राधान्याने निशुल्क प्रवेश देण्यात यावा, महाराष्ट्रात विविध घटकांसाठी कल्याणकारी महामंडळ आहे याच धरतीवर पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकार कल्याण महामंडळाचे स्थापन करण्यात यावे, शासनाने वय साठ वर्षे पूर्ण झाल्यावर जेष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती दिली होती आता सन्मानाचा लाभ देताना जाचक अटी टाकून ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानाच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे याबाबत शासनाने लक्ष घालून जेष्ठ पत्रकारांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, शासकीय समित्या तसेच जिल्हा नियोजन समिती, पोलीस दक्षता समिती, शांतता समिती, आरोग्य समिती, शालेय व्यवस्थापन समिती, इतर सर्व शासकीय समिती तसेच महामंडळ समिती व शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्ट मध्ये पत्रकारांना प्राधान्याने नियुक्ती करण्यात यावे,

पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांना शासकीय योजनांच्या प्रमुख्याने लाभ देण्यात यावा, राज्यात निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर अवैध व्यावसायिक, वाळूमाफिया, गौण खनिज माफिया, भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी व इतर बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तीकडून अथवा त्यांच्या गाव गुंडाकडून हल्ले केले जातात अथवा पत्रकारांना खोटे गुन्ह्यामध्ये अडकवून विनाकारण त्रास दिला जातो त्यामुळे निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना संबंधित पोलीस ठाण्याकडून पोलीस संरक्षण मिळावे, राज्यातील पत्रकारांचा कौटुंबिक आर्थिक सर्वे करण्यात यावा व आर्थिक दृष्ट्या दुर्बल पत्रकारांना व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे तसेच पत्रकारांना व्यवसायासाठी व निवासासाठी शासकीय भूखंड देण्यात यावा, पत्रकारांना देखील शासकीय विमा योजना व पेन्शन योजना लागू करावी, सतत जनतेच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा मिळावा, स्वीकृती असलेल्या जेष्ठ पत्रकारांना सन्मानचा लाभ सरसकट मिळावा, महानगरपालिका परिवहन सेवेत असलेल्या बसेस मध्ये पत्रकारांना मोफत प्रवास सवलत मिळावे इत्यादी मागण्याबाबत सकारात्मक विचार करून पत्रकारांच्या विविध मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्या करीता मुबंई येथे विधान भवनावर धडक मोर्चा नेऊन मंत्रालयात निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष,तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच इतर मोठ्या संख्येने राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पदधिकारी, व सदस्य उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved