Breaking News

जागतिक आदिवासी दिनानिमत्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-आदिवासी महिला संघटना मालेवाडा व आदिवासी युवा कमिटी यांच्या सौजन्याने दि.9 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुष्पांजली कार्यक्रम संपन्न झाला.जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला आदिवासी महिला संघटनेचे अध्यक्षा,वैशाली वरखडे व सचिव छबुबाई मरसकोल्हे व आदिवासी युवा कमिटीचे अधक्ष्य प्रफुल वरखडे व सचिव स्वप्नील मसराम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले,यावेळी अध्यक्ष प्रफुल वरखडे व सचिव स्वप्नील मसराम यांनी “जननायक भगवान बिरसा मुंडा” यांचे “क्रांती कार्य” या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन करून अभिवादन करण्यात आले की आज संयुक्त राष्ट्र संघामध्ये अमेरिका, रुस, चीन, फ्रांस, इंग्लंड, भारत असे एकूण १९२ देश सदस्य आहेत.

आपल्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले कि २१ व्या शतकात ज्याला आपण तंत्रज्ञानाचे युग, संगणकाचे युग असे म्हणतो…, त्या युगात जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज उपेक्षितांचे जीवन जगात आहे. गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला आहे. या विळख्यातून त्याला बाहेर पडायला संधी मिळण्याची शक्यता अधिकच अस्पष्ट आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून सन १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस “जागतिक आदिवासी दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासाभेतून सर्व सहभागी देशांना केली. त्यानंतर संपूर्ण जगात मग अमेरिका असो इतर आदिवासी समाज असलेले देश असोत त्यात भारताचाही सामावेस आहे.या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येवू लागला.

अशा शब्दात मान्यवरांनी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.या प्रसंगी आदिवासी महिला संघटनाच्या महिला,गौरी मरस्कोल्हे,वनिता मरस्कोल्हे, प्रणाली वरखडे,विना वरखडे,गीता मरस्कोल्हे, नमिता मसराम, उषा कुमरे,शशिकला मडावी,आदिमाया मसराम, कानुपात्रा कन्नाके,दुर्गा मरस्कोल्हे,मीराबाई मरस्कोल्हे धुरपता वरखडे व मोना वरखडे व युवा कमिटीचे अध्यक्ष आयु. प्रफुल वरखडे व श्रावनजी कुमरे,स्वप्नील मसराम व आदी.मान्यवर उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved