नागपूर हैदराबाद हायवेवर देवधरी फाटा येथील घटना
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ:-यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी पोलिस स्टेशन हद्दीत देवधरी येथील गणेश बबनराव मांडवकर व त्याचे काका प्रभाकर मारोती मांडवकर हे दोघेही शेतातील कामे आटोपून बैलबंडीने घरी येत असताना नागपूर ते पांढरकवडा नॅशनल हायवे क्रं.44 वर देवधरी वळण रस्ता ओलांडताना पांढरकवडा कडून येणारा ट्रक क्रं. एम. एच.40 बी जी.7292 चा चालक नामें आरोपी मेहबूब खां मोहम्मद खां पठाण वय (52)रा. देवाशी मोहल्ला पुराना बैल बाजार छिन्दवाडा ता. जि. छिंदवाडा याने आपलें वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालवून शेतातून घरी पायी जात असलेल्या देवधरी येथील प्रभाकर मारोती मांडवकर वय वर्ष (55)ला जबर धडक दिली यातच प्रभाकरचा जागीच मृत्यू झाला.
भरधाव ट्रकची धडक एवढी जबर होती की त्याचे शरीर ट्रॅकखाली प्रेस झाले होते व घटनास्थळी त्यांच्या मृत्यू झाला. काही कळण्याच्या आतच सदर ट्रकने अपघात स्थळावरून फलायन केले ही घटना २७ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता घडली या घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठविण्यात आले असून घटनास्तळावरून पलायन झालेला सदर ट्रक तेथून जवळच असलेल्या पेट्रोल पंपा वरून वडकी पोलीसांनी ताब्यात घेतला. आरोपीवर अप नं.481/2023कलम 304(अ ).279 भादवी सहकलम 184मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.