Breaking News

आरोग्यम धन:संपदा श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांचे प्रतिपादन आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिली व लॉयन्स क्लब ऑफ नागपूर ग्रिन सिटीचा उत्स्फूर्त उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव:-राळेगांव ता १२ (तालुका प्रतिनिधी ) आपले आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे कोरोनाच्या महामारीत जगाला समजले आहे .प्रत्येकाने आपले आयुष्य लाख मोलाचे समजून आपल्या आरोग्या प्रति जागरूक राहणे गरजेचे आहे .आरोग्य तपासणी शिबिर हे सर्व सामान्य माणसासाठी त्यांच्या प्रति असलेल्या सामाजिक उत्तर दायित्व म्हणून प्रत्येकाने काम करणे आवश्यक आहे . असे विचार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज राजे मुधोजी भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती व लायन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी च्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 सप्टेंबर रविवारला न्यु इंग्लिश हास्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजीत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत.

 

यावेळेस उद्घाटक म्हणून आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपस्थित होते .तर प्रमुख पाहुणे राणीसाहेब यशोदा ताई भोसले उपस्थित होत्या प्रमुख उपस्थीती म्हणून तहसीलदार अमित भोईटे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव सुनीलजी व्होरा,अजय सिंग,उप नगराध्यक्ष जानराव गिरी,प्रदीप ठुणे,राकेश राहूळकर, अँडअल्पेश देशमुख, बाळू धुमाळ,संदीप पेंदोर, प्राचार्य जवादे .विचार मंचावर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने राजे मुधोजी भोसले व राणीसाहेब यशोदा ताई भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

त्यानंतर तहसीलदार अमित भोईटे सुनील जी व्होरा माजी गव्हर्नर लॉयन्स क्लब यांनी उपक्रमाची प्रशंसा करून आरोग्य शिबिराचे आयोजन आपण वारंवार करावे असे आयोजकांना सुचविले कार्यक्रमाचे प्रास्ताविक , प्रा अशोक पिंपरे सूत्रसंचालन प्रा . रंजन चौधरी तर आभार प्रदर्शन राजू रोहनकर यांनी केलेआरोग्य तपासणी शिबिराला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी ते साठी अँड. मंगेश बोबडे ,मंगेश राऊत (बांधकाम सभापती नगर पंचायत राळेगाव ) माजी प्राचार्य सुरेन्द ताठे , राहुल बहाळे ,संजय दुरबुडे, शंकर मोहुरले , अँड किशोर मांडवकर योगेश इंगोले ‘नितीन कोमेजवार, दिलीप कन्नाके, लियाकत अली ,शुभम चिडाम , अक्षय विरुळकर, योगेश ठाकरे ,अमर ठाकरे,गोपाल मशरू, राजेंद्र नागपुरे ,सुनील भामकर ,किशोर जुणूनकर, प्रतीक बोबडे,रोहित वर्मा, ओम डाखोरे, अक्रमखान फैजल शेख यांनी प्रयत्न केले. डॉ‌. निशांत राठोड, डॉ. केवीन काबंळे,डॉ.ललीत पवार,डॉ.निधी गोयल,डॉ. अनुजा हडरखुरे , डॉ.आयुषी तायल, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ. वाघ, डॉ.दलाल ,डॉ. कोसरकार ,डॉ. चंदनखेडे,सुरेश चरडे,स्नेहा हिवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved