Breaking News

स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले-राहुल डोंगरे

शारदा विद्यालय तुमसर येथे प्रतिपादन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे लोकप्रिय नेते,विचारवंत,समाजसुधारक होते. त्यांनी स्त्री शिक्षण,विधवा विवाह,जातीवाद, अस्पृश्यता,बालविवाह,सती प्रथा,पुनर्विवाह विषयांवर लोकांना जागृत केले.त्याकाळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता .मृतवत झालेल्या स्त्रियांना नवसंजीवनी देण्याचे अलौकिक कार्य त्यांनी केले.स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले होते.भारतीय समाज त्यांचा आजन्म ऋणी राहील.असे प्रतिपादन राहुल डोंगरे यांनी केले.ते शारदा विद्यालय तुमसर येथे आयोजित महात्मा ज्योतिबा फुले ‘ स्मृतीदिन ‘ कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.कार्यक्रमाचे अतिथी म्हणून दिपक गडपायले , विद्या मस्के हे होते.

सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.कु.वैष्णवी चौधरी, सुवर्णा ठवकर,सुहाना शेंडे,नेहा बिरोले यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले.कु.नेत्रा मेश्राम,वैष्णवी चौधरी,सुवर्णा ठवकर,नेहा बिरोले ,सुहाना शेंडे यांनी “आले महात्मा फुले”या नृत्यातून प्रबोधन केले.

राहुल डोंगरे पुढे म्हणाले की, ज्योतिबा फुल्यांनी, शेतकऱ्याचं असुड,ब्राम्हणांचे कसब,गुलामगिरी अश्या अनेक प्रकारच्या ग्रंथातून त्यांनी समाज प्रबोधन केले.समाजातील विषमता नष्ट करणे,तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचविण्याचे कार्य सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केले.जोतिबांच्या आधाराने क्रांतिज्योती सावत्रीमाई फुले यांच्या पंखास बळ मिळाले.स्त्री शिक्षण हे त्या काळाची गरज होती, हे त्यांनी जाणले.अठराव्या शतकात जेव्हा स्त्रीसाठी फक्त ” चूल आणि मूल “एवढ्या पुरतेच क्षेत्र तिचे मर्यादित होते.अश्या अंधारमय जगात क्रांतिसूर्य व क्रांतिज्योती यांनी भारतीय समाजाचा अन्याय सहन करीत मुलींसाठी पहिली शाळा उघडुन क्रांती केली.आज अंतरीक्ष,प्रधानमंत्री,राष्ट्रपती,आय.ए.एस,आय.पी.एस,डॉक्टर, इंजिनियर,वकील, शास्त्रज्ञ,प्रत्येक मोठ्या पदावर एक स्त्री आहे.याचे श्रेय फुले दाम्पत्यांना जाते. तेव्हा स्त्रियांनी व भारतीय समाजाची फुल्यांचे आदर्श घेवून खरी देशसेवा ,मानव सेवा,विचाराला कृतीची साथ देवून केली पाहिजे,हेच खरे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांना अभिवादन ठरेल,असे परखड मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन कु.जान्हवी नेवारे यांनी केले.आभार नेत्रा मेश्राम हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाबिरप्रसाद आग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. ज्योती बालपांडे, वासू चरडे ,दिपक गडपायले,श्रीराम शेंडे,संजय बावनकर,प्रा.नवीन मलेवार,अशोक खंगार,अंकलेश तिजारे,प्रशांत जीवतोडे, नितुवर्षा घटारे,प्रीती भोयर,विद्या मस्के,सीमा मेश्राम,नलिनी देशमुख, सुकांक्षा भुरे,दिपक बालपांडे,नारायण मोहनकर, झंकेश्वरी सोनेवाणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात रंगले कविसंमेलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा चिमूर तालुक्यातील गडपिपरी येथे आयोजित …

आज चिमूर येथे आदिवासी लाभार्थी मेळावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आदिवासी एकात्मीक विकास प्रकल्प चिमूर च्या वतीने आदिवासी लाभार्थी मेळावा शुक्रवार ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved