आज रविवार, या वर्षाचा (२०२३) शेवटचा दिवस. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने नवीन वर्षाचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी आपणास नामी संधी आहे.
विशेष प्रतिनिधी अविनाश देशमुख 9 960052755
मी आपणास विनंती करतो की, सोमवार दिनांक ०१.०१.२०२४ मध्यरात्री ००.००.०१ वाजल्यापासुन सुरू होणारे नवीन वर्ष २०२४ साठी काही संकल्प, नियोजन करावे.
संकल्प
☞ (०१) प्रथम स्वतःवर प्रेम करा.
☞ (०२) वडिलधा-यांना मान द्या.
☞ (०३) बचत करायला शिका.
☞ (०४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा.
☞ (०५) चांगला मित्र परिवार वाढवा.
☞ (०६) व्यसनांपासून दूर रहा.
☞ (०७) भक्तीमार्ग अवलंबा.
☞ (०८) समाजसेवा करा.
☞ (०९) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा.
☞ (१०) यशोगाथांचे वाचन करा.
☞ (११) नैसर्गिक जीवन जगा.
☞ (१२) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
☞ (१३) आजच्या तरूण पणावरच उद्याचे वृद्धत्व अवलंबून आहे हे विसरू नका.
☞ (१४) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत याची सदैव जाणीव ठेवा.
☞ (१५) मागा म्हणजे मिळेल आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल.
आदर्श जीवन जगण्यासाठी
☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.
☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.
☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.
☞ (०४) आभार मानायला विसरू नका.
☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
☞ (०६) सतत हसतमुख रहा.
☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
☞ (११) कृती पुर्व विचार करा.
☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.
☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.
☞ (१७) विचार करून बोला.
☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.
*सर्वांना माझ्या कुटुंबाकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा–अविनाश देशमुख शेवगांव, धन्यवाद*