Breaking News

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू – ‘बुनी बियर्स’

बुनी बियर्स गारडियन्स कोड’ हा १० मे २०२४ ला भारतभर

मुंबई -राम कोडींलकर

मुंबई:-कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच चांगल्या वळणावर आयुष्य जगू शकतात. मुलांमध्ये संस्कारांची उत्तम पेरणी ही आई उत्तम करते असते, म्हणूनच जागतिक ‘मदर्स डे’चं निमित्त साधून ‘बुनी बियर्स’ या लोकप्रिय अॅनिमेटेड चित्रपटाच्या मालिकेचा पुढचा भाग ‘बुनी बियर्स गारडियन्स कोड’ हा १० मे २०२४ रोजी भारतभर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘बुनी बियर्स गारडियन्स कोड’ या चित्रपटाचा नुकतेच पोस्टर लॉंच झाले असून सर्व सोशल मिडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपट इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये असणाऱ्या धमाल पात्रांना बघितल्यावर चित्रपटात धमाकेदार कथा असून धमाल मजा येणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटाची कथा आणि यातील प्रसंग भारतातल्या चिमुलकल्यांसोबतच इतर सर्व रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेणार असल्याचं दिसत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लोकांना कोट्यवधींचा चुना

* शेवगावचे मातृ तीर्थ अर्बन निधी लिमिटेड चे कार्यालय गेल्या आठ पंधरा दिवसापासून बंद * …

बेपत्ता अल्पवयीन दलित मुलींचा तात्काळ शोध घ्यावा

जिल्हा पोलीस उपअधिक्षकांची भेट-तपासात वेग असल्याची खैरे यांची माहिती विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved