विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे मानवी जीवनात योग प्राणायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगामुळे 3~ H ( Head, Hand, Heart ) चा विकास होतो .योग साधनेमुळे विद्यार्थ्यांचे मन केंद्रित होण्यास मदत होते .शरीर व मन ताजेतवाने आणि उत्साही राहते. योगामुळे आपले शरीर ,मन व अध्यात्म एकमेकास जोडले जाते तसेच मानवाची शारीरिक ,मानसिक, आर्थिक, अध्यात्मिक जडणघडण होते असे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी केले. त्या आज आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून योग गुरु संजयजी बडे साहेब, योग गुरु शेखर पाटेकर साहेब ,शेवगाव आगार व्यवस्थापक अमोल कोतकर साहेब आबासाहेब काकडे विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड उपप्राचार्या रूपा खेडकर,निर्मल ब्राईटचे प्राचार्य अविराज काळे ,प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका परविन पटेल, प्रा.राम नेव्हल,संतोष देवरे, पर्यवेक्षक सुनील आव्हाड, हरिश्चंद्र मडके ,शिवाजी पोटभरे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शेवगाव आगार व्यवस्थापक अमोल कोतकर साहेब यांनी आपले विचार व्यक्त करताना एफ.डी.एल. संस्था ही एक नामांकित संस्था आहे. येथे विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवले जाते.विद्यार्थ्यांची प्रगती हीच संस्थेची प्रगती आहे. विद्यार्थी उच्च पदस्त झाल्यास आगार प्रमुख म्हणून आमच्या लालपरीने प्रवास केल्याचा आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान नक्कीच राहील असे ते म्हणाले.
योग गुरु संजय बडे व योग गुरु शेखर पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.हर्षदाताई काकडे यांच्या समवेत उपस्थित मान्यवर व ५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी योग व प्राणायामाचे धडे गिरवले. योग व प्राणायामाचे महत्त्व सांगताना योग गुरु संजय बडे म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने रक्तदान केले पाहिजे. तसेच देहदानाचा संकल्पही त्यांनी यावेळी केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य संपतराव दसपुते यांनी योगा व प्राणायामाचे मानवी जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश भागवत यांनी अनुमोदन रामदास पांढरे यांनी तर आभार परविन पटेल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*