Breaking News

भितिमुक्त समाज आणि नागरिक घडविण्यासाठी एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे महान कार्य राष्ट्रीय हितासाठी – प्रदीप रामटेके कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर:-देशात अनेक प्रकारच्या चळवळी अंतर्गत कार्य सुरू आहे.मात्र,एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे कार्य हे भितीयुक्त समाज व भितीमुक्त नागरिक निर्माण करणे आहे.जोपर्यंत भितीमुक्त समाज आणि भिती मुक्त नागरिक निर्माण होणार नाही तोपर्यंत देशातील नागरिकांना त्यांच्या अधिकार हक्काचे महत्त्व कळणार नाही.तद्वतच देशातील नागरिक समानता आणि समता अन्वये कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे येणार नाही,योग्य असा आवश्यक संघर्ष ते स्वत:च्या हितासाठी करणार नाही,म्हणूनच एन.जागतिक मानवाधिकार संघटने अंतर्गत केल्या जात असलेले कार्य व पार पाडल्या जात असलेले कर्तव्य हे महान देश व उत्तम नागरिक घडविण्यासाठी असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन सभेला संबोधित करताना महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी केले.हाॅटेल ओरिएंट ग्रॅंड नागपूर येथे पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हाध्यक्ष रोशनी गायकवाड ह्या होत्या तर मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके आवर्जून उपस्थित होते.

सभेचे विशेष मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मध्यमा मनिष सवाई,राज्य संघटक दिलीप तांदळे,राज्य सदस्या प्रा.भाग्यश्री मेश्राम हे मान्यवर जातीने उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मध्यमाताई मनिष सवाई यांनी संघटनेच्या आवश्यक कार्यावर मार्गदर्शनातून सविस्तर भर दिला तर राज्य संघटक दिलीप तांदळे यांनी संघटनेचे कार्य व संघटनेची शक्ती यावर विचार मांडले.राज्य सदस्या प्रा.भाग्यश्री मेश्राम यांनी संघटनेच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यासंबंधाने मार्गदर्शन केले.सभेच्या अध्यक्षा तथा नागपूर जिल्हाध्यक्षा रोशनी शिध्दार्थ गायकवाड यांनी अनेक उदाहरणे देत संघटनेचे कार्य कसे असावे आणि आपण काय करायला पाहिजे याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित केले आणि स्वतःची जबाबदारी विषद केली.महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी पुढे सविस्तर असे मार्गदर्शन करताना कायदेशीर प्रक्रिया आणि कायदेशीर कर्तव्य-कार्ये कसे असतात याकडे उपस्थित पदाधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधले.याचबरोबर कर्तव्य आणि कार्ये कशी पार पाडली जातात याची खुलासेवार माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी प्रथम सत्रात उपस्थितांना केलेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वपूर्ण ठरले.द्वितीय सत्रात नागपूर येथे,”एन.जागतिक मानवाधिकार संघटना नागपूर जिल्हा कार्यकारिणी अंतर्गत,”राज्यस्तरीय,कार्यक्रम घेण्यासंबधाने सविस्तर चर्चा सभाध्यक्षा रोशनी गायकवाड यांच्या उपस्थित करण्यात आली व राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यासंबंधाने पुढील सभेचे आयोजन करण्याचे त्यांनी ठरविले. हाॅटेल ओरिएंट ग्रॅंड नागपूर येथे सदर सभेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी केले होते.त्यांनी स्वतःच्या विनंम्रतेचा, संवेदनशीलतेचा आणि आदरयुक्त भावनेचा न बोलता सखोल परिचय देत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.

प्रदीप रामटेके हे एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत अंतर्गत महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष असताना,तद्वतच दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी असतांना,त्यांना पदाचा अजिबात अहंकार नसल्याचे सभेमधून पदोपदी जाणवत होते.प्रदीप रामटेके यांचा मनमिळावू स्वभाव आणि कार्य करण्याची त्यांची कार्यपध्दत उपस्थित पदाधिकाऱ्यांना बरेच शिकायला भाग पाडत होती,असे सभेमधून वारंवार पुढे येत होते.नागपूर जिल्हा साहाय्यक प्रशिध्दी प्रमुख सुनंदा गायकवाड सभेचे उत्तम सुत्रसंचलन केले आणि महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष दिक्षा कऱ्हाडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.खेळीमेळीच्या वातावरणात संभा संपन्न झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि हेच सभेचे वैशिष्ट्य ठरले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

महावितरणचा भोंगळ कारभार दुरुस्तीच्या नावाखाली तासनतास वीज गायब

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * जाब विचारायला गेल्यावर अधिकारी गायब ग्राहकांनी न्याय …

बौद्ध धर्म गुरु यांनी भीम जयंती चित्रपटाला लावली हजेरी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे वर्धा :- भीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved