Breaking News

धन्यवाद…नागपुर करांचे निरोप घेताना मन सुन्न झालं

THANK YOU….is not ENOUGH

काल नागपूरकरांचा निरोप घेताना मन सुन्न झालं होतं. लोकांनी माझ्यातला कठोर अधिकारी अनुभवला आहे. मात्र त्या अधिकाऱ्यातला भावुक अधिकारी आज नागपूरकरांनी अनुभवल्याचं विश्लेषण माध्यमांनी केलं. आयुष्यात कधी नव्हे इतका काल कोमेजलो होतो. नागपुरातून निघताना हृदय जड झालं होतं.

त्याला कारणही तसंच होतं. माझ्या नोकरीच्या कार्यकाळात मला थांबविण्यासाठी नागरिकांनी चक्क बंगल्याच्या दारावर चार-चार तास ठिय्या देतात, यातच सारे सामावले आहे. नागरिकांच्या भावनांचा मी आदर करतो. मात्र, मी केवळ एक निमित्त होतो. मी अधिकारी असल्याने माझी बदली ही ठरलेलीच आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य, जबाबदारी ओळखायला हवी. आपण दाखविलेले प्रेम अपूर्व आहे. त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. या प्रेमाची आणि आपण दाखविलेल्या विश्वासाची उतराई करणे मला तरी शक्य नाही. मी सदैव आपल्या प्रेमाच्या ऋणात राहू इच्छितो. पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक धन्यवाद…!

Completely Humbled…

Thank you…..Is not ENOUGH!!

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूरातील चांदा येथे आरटी-१ वाघ जेरबंद, मुख्यमंत्र्यानकडुन पथकांचे कौतुक

मुंबई, दि. २७ :- चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात दहशत माजविणाऱ्या वाघास आज दुपारी वन …

गोसीखुर्द: बुडित क्षेत्रातील गावांचे फेर सर्वेक्षण तातडीने करा

विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत जलसंपदा मंत्र्यांचे आदेश मुंबई, दि. १५: गोसीखुर्द प्रकल्पबधितांना न्याय देण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved