
नागपुर :- आम आदमी पार्टी गोधनी (ग्रामीण) संयोजक श्री आकाश काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐच्छिक रक्तदान शिबीर व दंत तपासणी शिबीराचे आयोजन गोधणी येथील फोर ब्रदर्स रेस्टोरेन्ट येथे करण्यात आले.
या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते यानिमित्य त्याच्या संभाषणातून कोविड-19 महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे अश्या परिस्थितीत रक्तदान करून जीवनदान देने ही काळाची गरज आहे व सर्व पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ज्यांना शक्य होत असेल त्यांनी रक्तदान अवश्य करावे. तसेच 10 नवीन कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ व टोपी देऊन पार्टीत सामील करण्यात आले.
श्री आकाश काळे यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा गाज्यवाज्या न करता कोरोना या गंभीर परिस्थितीत रक्ताचा पुरवठा प्रत्येक गरजू व्यक्तीला वेळेवर झाले पाहिजे व या महामारीचा कसा सामना करावा याबद्दल माहिती दिली तसेच त्यांनी सर्व जनतेला रक्तदान करण्याकरिता आव्हाहन केले.रक्तदान शिबिरात जवळपास 60 रक्तदात्यांनी आपले योगदान दिले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन श्री जय चौहान व श्री गुलशन सुखवानी यांनी केले. कार्यक्रमात विदर्भ संयोजक श्री देवेंद्र वानखेडे, राज्य कोषयाध्यश श्री जगजीत सिंग, राज्य सहसचिव श्री अशोक मिश्रा, नागपुर संघटन मंत्री श्री शंकर इंगोले, नागपुर सचिव श्री भूषण ढाकुलकर, गोधनी संयोजक श्री आकाश काळे, पश्चिम नागपुर सयोजक श्री आकाश कावळे, श्री जय चौहान, श्री विवेक चापले, श्री रोशन डोंगरे, श्री अमोल हाडके, श्री सचिन लोणकर, अलका पोपटकर, श्री गुलशन सुखवानी, श्री राजेंद्र पारवेकर श्री आमीर अन्सारी, श्री हरीश गुरबानी, श्री विश्वजित मसराम व अन्य कार्यकर्त्य उपस्थित होते.