Breaking News

तुकाराम मुंढेना परत नागपुरात नियुक्त करण्याची मागणी

प्रभाग 34 मधील शिवसेना उपशहरप्रमुखाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

नागपूर : दक्षिण नागपूर प्रभाग 34 मधील शिवसेना उपशहरप्रमुख दिपक पोहनेकर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आपल्या स्व:हस्ताक्षरात पत्र लिहून विनंती केली आहे की, नागपुरात कोरोना विषाणू व्हायरसने हाहाकार, थैमान माजवला आहे. गेल्या पंधरा दिवसात कोरोनाने खूप लोक मृत्युमुखी पडलेत. मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांसह आतापर्यंत 1753 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच संक्रमित रुग्णाची झपाट्याने वाढ होत आहे. नागपूरची स्थिती भयंकर झाली असून या सर्व युवक कार्यकर्तेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात रुजू करण्यात यावे. अशी विनंती निवेदनात केलेली आहे.

नागपुर शहरातून तुकाराम मुंढे यांना मनपा आयुक्त पदावरून कमी करून त्यांची बदली करण्यात आली. जवळ जवळ तीन हप्ते झाले असून कोरोनाने कहर माजवला आहे. आज नागपूरच्या जनतेला तुकाराम मुंढे यांची आठवण झाली असल्याचे दिपक पोहनेकर यांनी म्हंटले आहे. नागपूरची परिस्थिती हाता बाहेर चालली आहे. साधारण जनतेची लूट मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची लूट सुरू आहे. आणि लोकांच्या जीवाशी खेळणे सुरू आहे. हा प्रकार फक्त एकच माणूस सांभाळू शकतो ते म्हणजे तुकाराम मुंढे साहेब असे ही मत त्यांनी व्यक्त केले.

नागपूरातील नागरिकांची, स्थायी लोकांची, व सर्व जनतेची विनंती आहे की, पुन्हा नागपुरात तुकाराम मुंढे साहेबांची नियुक्ती करण्यात यावी. व नागपूरच्या जनतेला न्याय देण्यात यावा. अशी विनंती शिवसेसेनेचे उपशहर प्रमुख दिपक पोहनेकर यांच्या तर्फे एका प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved