Breaking News

कोरोनावर मात करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले लोकसेवेच्या कार्यात पुन्हा रुजू !

मुंबई दि 16 सप्टेंबर – विधानसभा अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले कोरोनाच्या आजारावर मात करून आज दि.16 सप्टेंबर रोजी नेहमीच्या उत्साहात विधानभवन, मुंबई येथील आपल्या कार्यालयात रुजू झाले. दि.7 व 8 सप्टेंबर, रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशना अगोदर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी स्वत:चे विलगीकरण करून उपचार घेतले. उपचारानंतर त्यांची कोरोना

आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्यावर ते आज लोकसेवेच्या कार्यात नेहमीच्या जोमाने आणि उत्साहात पुन्हा रूजू झाले. आज त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीतील महाविद्यालयास अनुदान उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बैठक, विधानमंडळातील दैनदिन कामकाज तसेच मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. आपण लवकर बरे व्हावे यासाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

एक रहस्यमय प्रेमकथा-‘प्रीत अधुरी’

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा …

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved