
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपुर:- चंद्रपुर जिल्ह्याचे बालरोग तज्ञ डॉ. मनोहर आनंदे वय ६४ यांचा कोरोनाच्या आजारामुळे नागपुर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झाले. त्यांच्या या दुःखद निधनाने वैद्यकीय क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन एक सृजनशील व्यक्तिमत्व हरपल्याने कुटुंबासह आप्तेष्टावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डाॅ. मनोहर आनंदे हे चंद्रपुर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी गावचे मुख्य रहीवासी आहे. त्यांनी हायस्कृल पर्यंतचे शिक्षण नवरगावला झाले असुन नवरगाव भारत विद्यालय शाळेतुन १० वी च्या नागपुर बोर्डातुन गुणवत्ता यादीत येणारे पहिले विद्यार्थी होते. त्यांच्या पश्चात आठवणींना उजाळा दिला जात आहे.