
नागपूर :- मित्रांनी पैशाच्या वादावरून मित्राची हत्या केल्याची घटना वाठोडा हद्दीतील मानवनगरात शुक्रवारी सायंकाळी उघड झाली. यश ठाकरे (२७) रा. संजयनगर झोपडपट्टी, असे मृताचे नाव आहे. आरोपी अजून फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, दोन्ही आरोपी आणि यश ठाकरे हे मित्र होते. काही दिवसांपासून पैशाच्या देवाण-घेवाणीतून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. शुक्रवारी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींनी यश ठाकरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा गेम केला. त्यानंतर मृतदेह मानवनगर भागातील झाडीत फेकून ते फरार झाले. नागरिकांनी याची माहिती पोलिसांनी पोलिस नियंत्रण कक्षाला दिली.
माहिती मिळताच वाठोडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.