
नागपूर- नागपूर मधील कामठी येथे दाढी बनविण्याच्या वादातून सलून चालकाची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी सायंकाळी कामठीतील न्यू खलाशी लाईन येथील सुदेश कटींग सलूनमध्ये माझी दाढी अधिक बनवून दे म्हणत आरोपी आकाश हाटे या तरुणाने सलून चालकाशी वादावादी सुरू केली.
सलून मध्ये अन्य ग्राहक असल्याने सलून चालकाने दाढी करण्यास नकार दिला. याचाच राग मनात बाळगून आरोपी आकाश हाटेने आपल्या 2 मित्रांसमवेत सलून चालकाच्या डोक्यावर डंड्याने वार करुन हत्या केली. ही घटना पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.