
नागपुर :- आज युवासेना नागपूर शहर तर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. श्री विनोद जाधव यांना RTO च्या तक्रारी संदर्भात युवासेना शहर चिटणीस सलमान खान यांच्या नेतृवाखाली निवेदन देण्यात आले.
लर्निंग लायसन्स आणि पर्मनंट लायसन्स ला अगोदर ७ दिवसाची वेटिंग Date मिळायची परंतु आता १ ते २ महिन्याचा कालावधी लागत आहे ,तसेच डुप्लिकेट लायसन्स साठी पोलीस FIR (missing report) दिली असता १ दिवसात लायसन्स मिळायचे परंतु आता ते सुध्दा RTO कार्यालयांनी १ महिन्याचे वेटिंग Date दिली आहे तिकडे या कारणाने लायसन्स नसल्याने ट्राफिक पोलीस चालन वर चालन देत आहे या मुळे जनतेला कोरोना काळात आर्थिक नुकसान होत आहे याला सर्वस्वी जवाबदार RTO आहे असे सलमान खान यांनी निवेदनात म्हटले आहे दुसरी बाब अशी आहे की, गाडी ट्रान्सफर करण्याचे कामे RTO ऑफिस मध्ये १ दिवसात होत असे आता या कामाला सुद्धा ऑनलाइन करून RTO ने Waiting Date देणे बंद केले आहे ,याचं कारणाने गाडी चे देवाण घेवाण चे कामे सुद्धा बंद झाल्याने जनतेचे आर्थिक नुकसान झाले आहे
यावर युवासेनेने जाब विचारले असता आम्ही आता सुट्टी च्या दिवशी शनिवार, रविवार ला सुद्धा RTO ऑफिस खुले केले आहे आणि तसेच Learning Licence साठी नागपुरात कुठेही फॉर्म भरू शकतात असे आश्वासन जाधव साहेबांनी दिले ,तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर RTO ऑफिस मधील पदाधिकारी व कर्मचारी यांना युवासेना तर्फे भगवे मास्क वाटप करण्यात आले.
निवेदन देते वेळी जिल्हा समन्वयक संदीप पटेल,शशिकांत ठाकरे, जिल्हा चिटणीस धीरज फंदी, शहर समन्वयक निलेश तिघरे, उपजिल्हा युवाअधिकारी छगन सोनवणे, विधानसभा समन्वयक हर्शल सावरकर, उपशहर युवाअधिकारी अमित रात्रे,निलेश नीनावे, उपविधानसभा युवाअधिकारी संजय डोकरमारे, अनिल खडपुरे,आशिष कुथें, सचिन तिडके ,तेजस वडवे ,राहुल काळे, राहुल शाहू, संदीप गुप्ता, किशोर निमजे, हर्ष कांबळे, आणि असंख्य युवाशिवसैनिक उपस्थित होते.