Breaking News

भांडणातुन झाला खुन खुनाचा गुन्हा झाला उघड

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमुर :- पोलीस स्टेशन चिमूर येथे दि 18/9/2020 रोजी फिर्यादी अंकिता दीपक नैताम वय 21 वर्ष रा कवडसी हिचे फिर्याद वरून तिचे पती दिपक वय 32 वर्ष रा. बामणी ता.उमरेड हे कवडसी जंगलातील बोडीतील पाण्यात बुडून मरण पावल्याने मर्ग नोंद करण्यात आला व तपास करण्यात आले असता मृतक याला त्याचा साळा हा बहिणीला त्रास देतो असे बोलुन जिवाने मारण्याची धमकी देत असल्याने मृतकाचा साळा रोशन सूर्यभान मसराम वय 30 वर्ष यास कसून विचारपूस केली असता, त्यांने मृतक याचसोबत घटनेदिवशी झगडा भांडण करून मृतक यास कवडसी शेतशिवारातील पाण्याचे बोडित धक्का देऊन जिवाने ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने फिर्यादी सुनंदा विजय नैताम – बोथली ता. उमरेड यांचे तक्रार वरून कलम 302 भादविचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे साहेब, अप्पर पो. अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ठाणेदार चिमूर यांचे मार्गदर्शनात सपोनि मंगेश मोहोड हे पथकातील कर्मचारी पोशी प्रमोद गुट्टे,सचिन गजभिये, सतीश झिलपे यांचेसह करीत आहे

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved