Breaking News

मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश नको

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सावली तर्फे मुख्यमंत्रीना पाठविले निवेदन 

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- सध्या सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असुन अनेक नेते व अनेक संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे असे म्हणत आहे. माञ हे चुकीचे आहे.अजुनपर्यत ओबीसीचे १९% आरक्षण महाराष्ट्रतील अनेक जिल्हात मिळालेले नाहीत. त्यात चंद्रपूर ११% यवतमाळ १४%, धुळे, नंदुरबार, नाशिक, रायगड, पालघर ९%आणि गडचिरोली ६%अशा प्रकारे ओबीसीच्या आरक्षणात विसंगती दिसुन येते ही विसंगती त्वरित दुर करण्यात यावी तसेच मराठा आरक्षणाला महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेचा विरोध नाही. माञ मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समावेश करु नये अशी महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महसभा तालुका सावलीची मागणी आहे.

तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी असे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसीलदार सावली यांच्या मार्फ़त पाठविण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा चंद्रपुर विभागीय सचीब तूळशिदास भुरसे, चंद्रपूर जिल्ह्य सचिव भाऊराव कोठारे त सावली तालुका अध्यक्ष ईश्वर गंडाटे, तालुका संघटक जितेश सोनटक्के, सुधीर लाकडे व महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा, युवा आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved